Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

13 जुलै च्या Candles .....

July 14, 2011

Search by Tags:  13 जुलै, Candles
13 जुलै 2011 ....

लोक नेहमी म्हणतात, 13 हा Unlucky no. आहे. मुंबईतल्या काही Aparatments मध्येही मी पाहिलंय, कि 12 मजले झाले कि 12 A असा मजला येतो, 13 हा आकडा नसतो.... कोणाच काही काम बिनसलं, किंवा, काम फिसकटलं, कि आपणही म्हणतो, ह्याचे तीन 13 वाजले....
.
तरीही माझ्यासाठी हा दिवस महत्वाचा होता... सकाळपासून उत्साहाचा होता... नवीन लेखमाला सुद्धा लिहायला घेतली होती... प्रा. भालचंद्र नेमाडे सारख्या लेखकाची अविस्मरणीय भेट झाली होती... तास न तास गप्पा झाल्या होत्या... त्या आठवणी लिहायच्या होत्या.. लिहिण्यासारख्या आहेत... इतका आनंदी होतो मी काल, की रात्री सहकुटुंब Candle Light Dinner चा plan हि केला होता...
.
आणि अचानक कळलं, कि " सार्वभौम भारत " देशाच्या लाडक्या " अतिथीचा " - कसाबचा वाढदिवस, सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देत, आतषबाजीने साजरा झाला...
21 जण यमसदनाला धाडले गेले.. आणि 100 च्या वर अंथरुणाला खिळले....
.
Candle Light Dinner च्या ऐवजी, आम्ही 21 Candles लावून आलो....

13 जुलै - माझ्या आयुष्यातला, " अविस्मरणीय काळा दिवस " ....

Search by Tags:  13 जुलै, Candles
Top

SANJAY PETHE's Blog

Blog Stats
  • 8977 hits